नमस्कार मित्रांनो नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.सध्या अशा व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या बक्षिसापेक्षा ही रक्कम पाच पटीने अधिक आहे.
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या तारखेपर्यंत करता येणार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज
नितीन गडकरींनी या नव्या धोरणाबद्दल बोलताना, सध्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जातं. मात्र अपघातानंतरच्या पहिल्या तासाभरात जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना अधिक बक्षिस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर पहिल्या सात दिवसांमध्ये जे उपचार केले जातील त्याचा खर्च सरकार करणार आहे.
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या तारखेपर्यंत करता येणार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज
यासाठीही मर्यादा दीड लाखांपर्यंत असून दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. गडकरींनी या कार्यक्रमात बोलताना, “केवळ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्यांसाठी ही योजना नाही तर राज्य महामार्गांवर अपघातात जखमी झालेल्यांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे,” अशी माहिती दिली.