नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत लाखो लाभार्थी बाहेर पडतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आजपासून (4 फेब्रुवारी) अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.तुमच्या कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार नाही अशी माहिती आहे.दरम्यान, या योजनेत सुरुवातीला सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते.
निकषांना जास्त महत्व दिले गेले नव्हते. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली. परंतु, आता या निकषांनुसारच लाभ देण्याचे राज्य सरकारने निश्चित केल्याचे दिसत आहे.पुणे जिल्ह्यात तब्बल 21 लाख 11 हजार 991 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. शासनाने आता चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचे ठरवले आहे. महिला बालकल्याण विभागाच सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत याबाबत राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
परिवहन विभागाने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे.त्यामुळे आता अधिक वेगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावे राज्य सरकारला पाठवली जातील. त्यानुसार या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची कार्यवाही होईल. त्यानुसार आता कार्यवाहीस लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.