सरकार देनार शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50% अनुदान असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकारकडून मल्चिंग पेपर मिळवा,पाण्याची बचत करत भरघोस पीक घ्या! योजनेसाठीची पात्रता,अर्जप्रक्रिया समजून घ्याशेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत.यामध्ये मल्चिंग पेपर अनुदान योजना एक महत्त्वाची संधी असून, या अंतर्गत शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाते.विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेलअर्ज ऑनलाईन भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर सोने झाले 5 हजार रुपयांनी स्वस्त इथे पहा ताजे नवीन दर

अर्जाची स्थिती आणि मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात पाहता येईल.तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करता येईल. अर्जामध्ये आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी. शंका असल्यास कृषी सहाय्यक किंवा अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा.तालुका कृषी अधिकारी अर्जाची आणि संलग्न कागदपत्रांची पडताळणी करतील.अर्ज मंजूर झाल्यानंतर,लाभार्थ्यांनी मल्चिंग पेपर खरेदी करावी.अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावरून थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात PFMS प्रणालीद्वारे जमा केली जाईल.महाराष्ट्रातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. एका कुटुंबातील फक्त एक व्यक्ती या योजनेस पात्र असेल. अर्जदार हा शेतकरी असणे अनिवार्य आहे.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर सोने झाले 5 हजार रुपयांनी स्वस्त इथे पहा ताजे नवीन दर

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

सातबारा उतारा व 8-अ प्रमाणपत्र

बँक खाते तपशील (पासबुकच्या प्रतीसह)

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

दरम्यान, ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि शेतीच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Comment