नमस्कार मित्रांनो संपूर्ण देशाचे लक्ष 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या देशाच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसह शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे.अशातच आता पीएस किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते.
मात्र आता बजेटमध्ये ही रक्कम 10000 रुपयांपर्यंत वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. देशात गेल्या काही काळापासून महागाईचा सतत वाढत आहे. याचा शेतीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दिली जाणाऱी 6000 रुपयांची आर्थिक मदत पुरेशी नाही. त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढवली तर शेतकऱ्यांना खूप फायदा होईल, असे अनेकांनी म्हटले आहे.यामुळे शेतकरी शेतीमध्ये अधिक चांगली गुंतवणूक करू शकतील. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल असं तज्ञांनी म्हटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम 6000 रुपयांवरून 10000 रुपये करण्याचा विचार करत आहे.
मात्र अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही किंवा सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आगागी अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेचे 18 हप्ते जारी केले आहेत. आता 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे.