नमस्कार मित्रांनो सरकारच्या लोकप्रिय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana – PMUY) नवीन नियमांमुळे आता एकाच कुटुंबातील दोन महिलांना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ही योजना, जी गरीब कुटुंबांतील महिलांना स्वच्छ ईंधन उपलब्ध करून देण्यासाठी 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती.आता 2025 मध्ये आणखी व्यापक आणि सक्षम बनली आहे. या योजनेतून आतापर्यंत 12 कोटींपेक्षा जास्त कनेक्शन्स देण्यात आले असून, गेल्या पाच वर्षांत सिलिंडर रिफिलची संख्या दुप्पट झाली आहे. चला, जाणून घेऊया नवीन नियम, पात्रता आणि लाभ कसा मिळवावा याबाबत सविस्तर माहिती.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश हा गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देणे आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत 12 कोटी कनेक्शन्स वितरित झाले असून, दरवर्षी सरासरी 4.5 सिलिंडर प्रति कुटुंब वापरले जात आहेत.सरकारच्या आकडेवारीनुसार, उज्ज्वला 2.0 (2021 मध्ये सुरू) अंतर्गत 1.6 कोटी अतिरिक्त कनेक्शन्स देण्याचे लक्ष्य गाठण्यात आले आहे.
ही योजना विशेषतः ग्रामीण आणि गरीब कुटुंबांमधील महिलांना लक्ष्य करते, ज्यांचा पारंपरिक इंधनावर (लाकूड, कोळसा) अवलंबित कमी करून आरोग्य आणि पर्यावरणाला फायदा होईल.सरकारी योजनेनुसार, एका कुटुंबाला फक्त एकच कनेक्शन दिले जाते. याचा अर्थ असा की कुटुंबातील काही महिलेचे उज्ज्वला योजनेअंतर्गत आधीच कनेक्शन आहे आणि त्या कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला आहेत. मग अशा परिस्थितीत, इतर महिलांना लाभ मिळू शकणार नाही. पंरतू एकाच कुटुंबातील दोन महिला वेगवेगळ्या घरात राहतात. जर दोघांकडे वेगवेगळे रेशनकार्ड असतील आणि दोघेही त्यांच्या कुटुंबाचे वेगळे ओळखपत्र वापरत असतील तर अशा परिस्थितीत दोन्ही महिलांना लाभ मिळू शकतो. यासाठी, गॅस एजन्सी आणि तेल कंपन्यांकडून पडताळणी केली जाते.
उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
1. ऑनलाइन अर्ज: PMUY च्या अधिकृत वेबसाइट (pmuy.gov.in) वर जा आणि ‘Apply For New Ujjwala 2.0 Connection’ वर क्लिक करा.
2. कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड (बीपीएल/अत्योदय), बँक पासबूक, आणि पासपोर्ट आकारातील फोटो अपलोड करा.
3. ई-केवायसी: नजीकच्या गॅस वितरकाकडे जाऊन ई-केवायसी पूर्ण करा. हे बायोमेट्रिक ओळखीद्वारे केले जाते.
वितरकाकडून संपर्क: तुमच्या परिसरातील गॅस वितरकाकडे अर्ज जमा करा. वितरक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल.
5. कनेक्शन मिळणे: पडताळणी झाल्यावर 15-30 दिवसांत कनेक्शन आणि मोफत सिलिंडर मिळेल.
जर एकाच कुटुंबातील दुसरी महिला लाभ घ्यायची असेल, तर तिला स्वतंत्र अर्ज आणि कागदपत्रे सादर करावी लागतील. यामुळे प्रक्रिया थोड्या जटिल होऊ शकते, पण स्थानिक गॅस वितरकाची मदत घेऊन ही प्रक्रिया सोपी करता येते.