लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, मार्चचे पैसे कधी मिळणार? येथे जाणून घ्या पूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारची लाडकी बहीण योजना अल्पावधित लोकप्रिय झालेली आहे. सध्या राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत.काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल, अशी चर्चा रंगली होती, मात्र सध्या एकाच हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे आता मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे सुद्धा बघा : राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद होणार

याबाबत महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात. फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत, मात्र आता मार्चचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. याबाबत ट्विट करत आदिती तटकरेंनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे.

हे सुद्धा बघा : राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद होणार

प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे.’ त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 12 मार्चपर्यंत मार्चचेही पैसे मिळणार आहेत.

Leave a Comment