नमस्कार मित्रांनो लखपती दीदी होण्याची संधी! सोलापूर जिल्ह्यातील एक लाख २० हजार महिलांना मिळणार अर्थसहाय्य; मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातून वाढीव निधीग्रामीण भागातील गरीब, जोखीम प्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्त्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करून त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा, शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी ‘उमेद’मार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.
हे सुद्धा बघा : पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना 10 लाख रुपयांचे होणार 44 लाख रुपये असा करा अर्ज
त्या अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाखापेक्षा जास्त होण्यासाठी त्यांना दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यवसाय संधी निर्माण करून दिले जात आहेत. तसेच विविध स्तरावर रुक्मिणी सरससारखे प्रदर्शन भरवून महिलांच्या उद्योगांना बाजारपेठ निर्माण करून दिली जात आहे.जिल्ह्यात एकूण २३ हजार ६७५ स्वयंसहाय्यता समूह आहेत.जिल्ह्यात बऱ्यापैकी समूह स्थापन झाल्याने सरकारने नव्याने उद्दिष्ट दिले नाही. ३२० कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते.
हे सुद्धा बघा : पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना 10 लाख रुपयांचे होणार 44 लाख रुपये असा करा अर्ज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ६० कोटींचे उद्दिष्ट वाढवून मिळाले होते.आतापर्यंत ३४३ कोटींचे कर्जवाटप झाल्याची माहिती उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे यांनी दिली. तर वैयक्तिक कर्जासाठी जिल्ह्याला २ हजार २०० लाभार्थींचे उद्दिष्ट होते. १०० दिवसांच्या कार्यक्रमात आणखी २ हजार २०० लाभार्थींचे उद्दिष्ट मिळाले. त्यापैकी २ हजार ४७४ जणांना जवळपास २५ कोटींचे कर्ज देण्यात आले आहे.