नमस्कार मित्रांनो स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो. व्यवसाय सुरु करायचा म्हटल्यावर भांडवल हे लागते.जर तुम्हाला स्वतः चा व्यवसाय सुरु करायचे असेल तर तुम्हाल स्वनिधी योजनेतून कर्ज मिळवू शकतात योजनेत तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज मिळणार आहे.स्वनिधी योजनेत तु्म्हाला ८० हजारांपर्यंत कर्ज मिळू शकतात.
तीन हप्त्यांमध्ये तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर तुम्हाला कमीत कमी व्याजदर द्यावे लागणार आहे.स्वनिधी योजनेअंतर्गत स्ट्रीट स्टॉल म्हणजे फळविक्रेते, भाजीविक्रेते यांना कर्ज मिळणार आहे लहान व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली आहे. लघुउद्योगांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सुरु केली होतीया योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाइन अर्ज केल्यावर लगेचच तुम्हाला १०,००० रुपये मिळणार आहेत. तर या रक्कमेची परतफेड केल्यावर तुम्हाला २०,००० रुपये मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही २०,००० रुपयांची परतफेड केली तर तुम्हाला ५०,००० रुपये मिळणार आहे.या योजनेत तुम्हाला ८०,००० रुपयांची मदत मिळणार आहे.पीएम स्वनिधी योजनेत ७ टक्के व्याजदर आकारले जाते.
याशिवाय डिजिटल व्यव्हार केल्यावर तुम्हाला वार्षिक १२०० रुपयांचा कॅश बॅक दिला जाईल. या योजनेत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.पीएम स्वनिधी योजनेत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही हमीची गरज नसते. या योजनेत घेतलेली रक्कम तुम्ही १ वर्षाच्या आत तुम्हाला परत करायची असते. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.