नमस्कार मित्रांनो लोकप्रिय असलेली राज्यातील लाडकी बहीण योजना रोज नवीन मुद्द्यांमुळे चर्चेत असते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली.राज्यातील अल्प उत्पन्न प्रवर्गातील भगिनींना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना आणण्यात आली व विधानसभा निवडणुकीच्या आधी फारसे काटेकोर निकष न लावता २ कोटी ६० लाख महिलांना प्रती दर महा १५०० रुपये देण्यात आले.सर्वाधिक लोकप्रिय असलेली राज्यातील लाडकी बहीण योजना रोज नवीन मुद्द्यांमुळे चर्चेत असते.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. राज्यातील अल्प उत्पन्न प्रवर्गातील भगिनींना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना आणण्यात आली व विधानसभा निवडणुकीच्या आधी फारसे काटेकोर निकष न लावता २ कोटी ६० लाख महिलांना प्रती दर महा १५०० रुपये देण्यात आले. माय-भगिणींनी प्रचंड खुष होऊन राज्यात महायुती सरकार निवडून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. दरम्यान, निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने त्यांच्या पंचसुत्रीमध्ये लाडक्या बहिणींना केंद्रस्थानी ठेऊन राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर लाडक्या बहीणींना २१०० रूपये देणार असल्याचे जाहीर केले.
साहजिकच त्याचा फायदा निवडणुकीत महायुती सरकारला झाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात लाडक्या बहीणीमुळे महायुती सरकारला कधी नव्हे इतकं प्रचंड संख्याबळ मिळालेपरंतु निवडणुकीनंतर लगेचच या योजनेचे निकष बदलण्यात आले.खरंतर ही मूळ योजना पहिल्यांदा राबवण्यात आली शेजारच्या मध्यप्रदेशात. तिथे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना तिथे सुरू केली. तिला तुफानी यश मिळालं आणि भाजपने मध्यप्रदेशात हॅट्ट्रिक केली. त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात महाराष्ट्रात मात्र रोज नवीन नियम लागू करण्यात येऊ लागले. नेमके काय आहेत निकष? कोणत्या मुद्द्यांवर लाडक्या बहीणीचे पैसे अडकणार जाणून घेऊया.