नमस्कार मित्रांनो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी सरकार नेहमीच अनेक योजना राबवत असतात.महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना आहेत.ड्रोन दीदी योजनेत महिलांना रोजगाराची संधी मिळते.त्यामुळे त्यांना आर्थिक मदतदेखील मिळते. ड्रोन दीदी योजनेत महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देते.
या योजनेत महिलांना ड्रोन दिले जातात. याचसोबत ड्रोम उडवण्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाते. याचसोबत महिलांना ८ लाखांची सब्सिडी दिली जाते. योजनेत आतापर्यंत १० कोटी महिला स्वंय सहायता समूहाशी जोडल्या गेल्या आहेत. जवळपास १४,५०० महिलांना ड्रोन दिले जाणार आहे. याचसोबत ८ लाखांची सब्सिडी दिली जाणार आहे.नमो ड्रोन दीदी योजनेत महिलांना ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग दिली जाणार आहे.ड्रोनच्या वापरामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक गोष्टींचा वापर करता येणार आहे. यामुळे शेतीला खूप फायदा होणार आहे.२०२३ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित महिलांना १५००० रुपये दिले जातात.
ज्या महिला ड्रोन दीदी म्हणून काम करतील त्यांनाच हे मानधन मिळणार आहे.याचसोबत सरकार महिलांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सब्सिडीदेखील देते. सरकार ड्रोनच्या किंमतीची ८० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ८ लाख रुपये अनुदान म्हणून देते. याचसोबत उरलेल्या रक्कमेसाठी कर्जदेखील उपलब्ध करुन दिले जाते. या कर्जाची परतफेड फक्त ३ टक्के व्याजदराने करावी लागणार आहे.या ड्रोनच्या मदतीने बचत गट दरवर्षी अतिरिक्त १ लाख रुपये कमाई करु शकतात. या ड्रोन किटमध्ये एक ड्रोन बॉक्स, चार अतिरिक्त बॅटरी आणि चार्जिंग हब मिळणार आहे.