या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरचं ही रक्कम वाढून 2100 रुपये केली जाणार आहे.लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची ओढ लागली आहे.मात्र हा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! 1 मार्चला मोठा निर्णय होणार 2100 रुपये मिळणार यादीत नाव तपासा

याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी जालना दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली. ‘लाडक्या बहि‍णींचा हप्ता पुढच्या आठ दिवसांत खात्यात येईल’, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. म्हणजेच 22 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात महायुतीकडून सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिलपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! 1 मार्चला मोठा निर्णय होणार 2100 रुपये मिळणार यादीत नाव तपासा

राज्यातील महिला व बाल कल्याण विभाग लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करत आहे.यानुसार लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर त्यांना फटका बसणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आगामी काळात अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चारचाकी वाहनांची तपासणी करणार आहेत, त्यानंतर अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे.

Leave a Comment