शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मिळणार मोफत वीज इथे बघा पात्र शेतकरी कोणते

नमस्कार मित्रांनो बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना (Agricultural Pump) मोफत वीजपुरवठा केला जात आहे. पुढील पाच वर्षांपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना शून्य वीजबिल (Zero Electricity Bill) पाठविले जाणार आहेत्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे.या योजनेतून पहिल्या सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९१ कोटी रुपयांची वीजबिल माफी देण्यात आली आहे.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर सरकार देणाऱ या नागरिकांना व्यवसायासाठी मोफत 100 टक्के अनुदानावर रिक्षा असा करा अर्ज

कृषिपंपातील चालू वीजबिलाची थकबाकी पुढील पाच वर्षे सरकार भरणार आहे. कृषिपंपधारकांना दर तीन महिन्याला ८५ कोटी रुपयांचे वीजबिल दिले जाते. चालू वीजबिलाचे चुकारे सरकार जमा करणार आहे. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांचे १९१ कोटी रुपयांचे वीजबिल सरकारने माफ केले आहे.यामुळे शेतकऱ्यांवर येणारा कृषिपंपाचा थकीत वीजबिलांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे थकीत वीजबिलामुळे कापली जाणारी शेतकऱ्यांची वीज आणि डीपी दुरुस्तीचा प्रश्न निकाली निघणार आहे.नियमित वीज बिलाला राज्य शासनाने बिलमाफी दिली आहे.याचवेळी जुने थकीत वीज बिल या संदर्भात कुठल्याही सूचना निघालेल्या नाहीत.तीन महिन्याला कृषिपंपाचे वीजबिल दिले जाते.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर सरकार देणाऱ या नागरिकांना व्यवसायासाठी मोफत 100 टक्के अनुदानावर रिक्षा असा करा अर्ज

याकरिता वीज वितरण कंपनीकडून वसुली मोहीम राबविली जाते. हिवाळा आणि उन्हाळा या हंगामात डीपीवर काही बिघाड झाला अथवा तार जळाली तर चालू थकीत बिल प्रथम भरायला लावले जात होते. शेतकऱ्यांचे बिल सरकार भरत असल्याने सव्वा लाख शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.बळीराजा मोफत वीजबिल योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना शून्य वीजबिल राहणार आहे. सहा महिन्यांचे १९१ कोटींचे बिल सरकारने माफ केले आहे.

Leave a Comment