नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आर्थिक मदत, उत्पादनवाढ आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या आहेत, आपण पाहुयात…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी 2025) देशाचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आपले अर्थसंकल्पीय भाषण केले.भाषण सुरू असताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ केला आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शेतकऱ्यांवर घोषणांचा पाऊस पाडला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयांचा देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहेडाळींसाठी आत्मनिर्भर योजना राबवली जाणारडाळींचे उत्पादन वाढण्यासाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भर योजना राबवली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.कापूस उत्पादन वाढवणारकापूस उत्पादन वाढवण्यासाठी सरकार योजना राबवणार आहे.
याचा महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.तसेच बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार. तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं असेल.किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या लाभात मोठा बदल करण्यात येणार आहे. कृषी कर्जाची मर्यादा 3 ते 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. याचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.