शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आता वर्षाला 15000 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’त सहा हजार रुपयांची भर घालून दरवर्षी १२ हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत  राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’त सहा हजार रुपयांची भर घालून दरवर्षी १२ हजार रुपये देण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा बघा : या लोकांना मिळणार नाही मोफत रेशन अशाप्रकारे बघा यादीत आपले नाव

लवकरच त्यात वाढ करून शेतकऱ्यांना १५ हजार रुपये मिळणार आहेत,”अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी केली. तसेच राज्यात २५ लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.फडणवीस म्हणाले, ”एक रुपयात पीक विमा योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.कृषीमधील पारंपरिक विज्ञानदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा बघा : या लोकांना मिळणार नाही मोफत रेशन अशाप्रकारे बघा यादीत आपले नाव

पुन्हा संपूर्ण जग नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहे. नैसर्गिक बाबींचा वापर अधिकाधिक करून उत्पादकता कशी वाढवता येईल, तसेच खाद्यामध्ये विषयुक्त पदार्थांचा वापर कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” यावेळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Comment