नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
पीसीएमसीअंतर्गत दिव्यांग भवनाच्या संचलनासाठी पदे भरती केली जाणार आहे.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
हे सुद्धा बघा : बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज झाले सुरू अशाप्रकारे करा अर्ज मिळवा मोफत भांडी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कॉमप्युटर ऑपरेटर, लिपिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५,००० ते ४०,००० रुपये पगार मिळणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सिनियस स्पीच थेरपिस्ट, सिनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनिअर ऑडिओलॉजिस्ट, सिनियर प्रोस्टेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, लिपिक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.१० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे.
हे सुद्धा बघा : बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज झाले सुरू अशाप्रकारे करा अर्ज मिळवा मोफत भांडी
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. त्यांनी संबंधित क्षेत्रात केलेली पदवी याबाबतची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.यानंतर मुलाखतीसाठी तुम्हाला २२ जानेवारी २०२५ रोजी उपस्थित राहायचे आहे. नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलिस चौकी समोर, पुणे ४११ ०३३ येथे उपस्थित राहायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना वाचा.