नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचण्यासाठी ओळखलं जात नाही. तर गुंतवणुकीतील अनेक आकर्षक योजना त्यांच्याकडून चालवल्या जातात. सरकारी हमी असल्यामुळे असंख्य लोक यात गुंतवणूक करीत आहेत.तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असल्यास,तुम्हाला दर ३ वर्षांनी तुमचे केवायसी करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते. तुम्हाला तिथे जाऊन तुमची ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील. पण इंडिया पोस्टने यातून सर्व खातेधारकांची सुटका केली आहे.
आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन पूर्ण करता येईल.याची सुरुवात कर्नाटकातून करणार आहे. याचा फायदा कर्नाटकातील १ कोटी ९० लाख पोस्टल खातेधारकांना होणार आहे.कर्नाटकचे मुख्य पोस्टमास्टर जनरल राजेंद्र एस कुमार म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दर तीन वर्षांनी केवायसी संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी मूळ कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हे घरबसल्या ऑनलाइन आधार प्रमाणीकरणाद्वारे केले जाईल.
मोबाईल ॲपवर फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी खातेधारकांना इंडिया पोस्ट वेबसाइट indiapost.gov.in वर ई-बँकिंग पर्यायावर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे KYC संबंधित सर्व कागदपत्रे तेथे अपलोड करावी लागतील. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही मूळ कागदपत्रे न बाळगताही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. टपाल विभाग आधार प्रमाणीकरणाद्वारे तुमच्या ओळखीची पुष्टी करेल. यानंतर तुम्ही खात्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करू शकता. लवकरच ही सुविधा इतर राज्यातही मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले