12वी चा निकाल झाला जाहीर आता 10वी चा निकाल या तारखेला लागणार

नमस्कार मित्रांनो 12वीच्या निकाल अखेर आज (5 मे 2025) जाहीर झाला. फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा 12 वीचा निकाल हा लवकर जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता 10 वीचा निकाल देखील लवकरच जाहीर होईल. असं अंदाज वर्तविण्यात येत आहे.बारावीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर आता 10 वीच्या परीक्षेचा निकाल हा 15 मे पर्यंत जाहीर केला जाऊ शकतात. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, बारावीचे निकाल 21 मे रोजी आणि दहावीचे निकाल 27 मे रोजी जाहीर झाले.

हे सुद्धा बघा : कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! या दिवसापासून होणार 8वा वेतन आयोग लागू मोठी अपडेट आली समोर

लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा ही पुढील आठवड्यात संपू शकते. बारावीच्या निकालाची तारीख ही काल (4 मार्च) जाहीर करण्यात आली होती. ज्यानंतर आज (5 मे) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे 10 वीच्या निकालाची नेमकी तारीख देखील आदल्या दिवशीच जाहीर केली जाईल.गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर, साधारणपणे महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. पण यंदापासून हे निकाल लवकरच जाहीर करण्याचं बोर्डाचं धोरण आहे.या 9 वेबसाईटवर पाहता येईल निकाल

हे सुद्धा बघा : कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! या दिवसापासून होणार 8वा वेतन आयोग लागू मोठी अपडेट आली समोर

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. https://hscresult.mkcl.org

4. https://results.targetpublications.org

5. https://results.navneet.com

6.https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या गुणपत्रिका ऑनलाइन मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर त्यांचा रोल/सीट क्रमांक आणि त्यांच्या आईचे पहिले नाव प्रविष्ट करावे लागेल. ही माहिती प्रवेशपत्र किंवा हॉल तिकिटावर उपलब्ध असेल. तथापि, जर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र मिळाले नसेल, तर तुम्ही तुमच्या शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि सीट नंबरबाबत मदत मागू शकता.

Leave a Comment