नमस्कार मित्रांनो : लग्नसराईच्या हंगामादरम्यान आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर ६१७ रुपये प्रति १० ग्रॅमनं स्वस्त झाला. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,६६९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला तर, चांदी १२१ रुपयांनी स्वस्त होऊन ९७,५१३ रुपये प्रति किलोवर उघडली. जीएसटीमुळे सोन्याचा भाव आता ९८,३३९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.तर चांदीचा दर प्रति किलो १००४३८ रुपयांनी वाढ झाली आहे.
हे सुद्धा बघा : RBI ने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांना मिळणार आता हे फायदे
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
हे सुद्धा बघा : RBI ने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांना मिळणार आता हे फायदे
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ६१४ रुपयांनी घसरून ९५,२८६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ५६५ रुपयांनी घसरून ८७,६३३ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव ४६३ रुपयांनी कमी झाला असून तो ७१,७५२ रुपयांवर पोहोचलाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३६१ रुपयांनी कमी होऊन ५६,९६६ रुपये झालाय.