नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांमुळे नागरिकांना आर्थिक मदत मिळते.संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते.परंतु जे लोक संघटित क्षेत्रात काम करत नाही त्यांचं काय?त्यांना भविष्यात पेन्शन मिळणार की नाही असा प्रश्न पडलेला असतो.यामुळेच केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी खास योजना राबवली आहे. या कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जाते.
हे सुद्धा बघा : RBI ने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांना मिळणार आता हे फायदे
केंद्र सरकारच्या या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर ३००० रुपयांची पेन्शन मिळते. याचसोबत व्हिमा कव्हरदेखील मिळतो. यासाठी त्यांना ई- श्रम नावाचे डिजिटल कार्डदेखील दिले जाते.असंघटित क्षेत्रातील लोकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, यासाठी योजना राबवली जाते.संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी ईपीएफएओशी जोडले गेलेले असतात. ईपीएफओमध्ये दर महिन्याला पगारातील काही रक्कम ही पेन्शनसाठी जमा केली जाते. परंतु असंघटित कामगारांसाठी असं काहीच नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना राबवली आहे. त्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन दिली जाते.ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
हे सुद्धा बघा : RBI ने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांना मिळणार आता हे फायदे
१६ ते ५९ वयोगटातील कामगार या योजनेसाठी अर्ज करु शकतात. ई-श्रम कार्ड बनवण्याची प्रोसेस (E Shram Card Application Process)
ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम https://eshram.gov.in/ वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर रजिस्टर eShram या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
यानंतर विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्या. त्याचसोबत तुमचा पत्ता आणि शैक्षणिक माहिती द्या.
यानंतर तुम्ही कोणते काम करता याचा पर्याय निवडा. यानंतर फॉर्म भरा.
यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे ई-श्रम कार्ड तयार होणार आहे.