State Bank Scheme नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँकेने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. स्टेट बँकांच्या या योजनांमध्ये नागरिकांना भरघोस परतावा मिळतो.स्टेट बँकेने आपली ४४४ दिवसांची एफडी स्कीम (444 Days FD Scheme) पुन्हा एकदा सुरु केली आहे.हे योजना ३१ मार्च रोजी बंद करण्यात आली होती. मात्र,आता ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे.अमृत वृष्टी (Amrit Vrishti Scheme) योजनेत तुम्ही ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करु शकतात.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी.! या लाडक्या बहिणींचा हप्ता होणार कायमचा बंद
कमीत कमी कालावधीत तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. परंतु यावेळी अमृत वृष्टी योजनेच्या व्याजदरात २० बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. हे नवीन दर १५ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आले आहेत.स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, अमृत वृष्टी या योजनेत सध्या नागरिकांना ७.०५ टक्के व्याजदर मिळते. याआधी या योजनेत ७.२५ टक्के व्याजदर मिळायचे. अमृत वृष्टी या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त फायदा होतो.या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याजदर मिळते.तर सुपर सिनियर सिटीजन असलेल्या नागरिकांना ७.६५ टक्के व्याजदर मिळते.स्टेट बँकेच्या या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली होती.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी.! या लाडक्या बहिणींचा हप्ता होणार कायमचा बंद
ही योजना मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. दरम्यान, ग्राहकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.अमृत वृष्टी ही एक टर्म डिपॉझिट योजना आहे. या योजनेचा कालावधी ४४४ दिवसांचा आहे. ४४४ दिवसांसाठी तुम्ही गुंतवणूक करु शकतात. भारतीय नागरिक तसेच एनआरआयदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्टेट बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करु शकतात. याचसोबत मोबाईल बँकिंग अॅपवरुनदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.