तुमचे पॅन कार्ड होणार बंद? या तारखेपर्यंत करा लगेच हे काम

नमस्कार मित्रांनो पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर ही बातमी वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला याचसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तुम्ही या नव्या डेडलाइनपर्यंतही पॅन आणि आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते.सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आणखी एक डेडलाइन जारी केली आहे आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डधारकांना या शेवटच्या तारखेपूर्वी त्यांची दोन्ही कागदपत्रे लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुमचं पॅन कार्ड बंद होऊ शकतं.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या लाडक्या बहिणींना मिळणाऱ मोफत गॅस सिलेंडर इथे बघा अर्ज प्रक्रिया

जर आपण अद्याप ते केले नसेल तर शक्य तितक्या लवकर ते करा.तुम्ही या नव्या डेडलाइनपर्यंतही पॅन आणि आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही आर्थिक व्यवहारात याचा वापर करू शकणार नाही. पॅन आणि आधार लिंक करणे अतिशय सोपे आहे. आपण हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन करू शकता. ऑनलाइन लिंकिंगसाठी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एक नवीन नोट जारी केली आहे, ज्यानुसार काही स्थायी खाते क्रमांक (PAN) धारकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांचे पॅन आधारशी जोडणे आवश्यक आहे. हे विशेषत: अशा लोकांना लागू आहे ज्यांनी त्यांच्या वास्तविक आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीवापरुन आपले पॅन कार्ड बनवले आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या लाडक्या बहिणींना मिळणाऱ मोफत गॅस सिलेंडर इथे बघा अर्ज प्रक्रिया

31 डिसेंबरच्या डेडलाइननंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यास 1,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. यात पॅन आणि आधार आयडी अस्तित्वात आहेत परंतु ते जोडलेले नाहीत अशा प्रकरणांचाही समावेश आहे. तसेच ज्यांनी पॅन आणि आधार लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन बंद होण्याचा धोका आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन कसे लिंक करावे?

आयकर विभागाच्या वेबसाइटद्वारे पॅन आणि आधार ऑनलाइन लिंक केले जाऊ शकते. पॅन आणि आधार ऑफलाइन देखील लिंक केले जाऊ शकतात, यासाठी आपल्याला पॅन सेवा पुरवठादार, NSDL किंवा UTIITSL च्या सेवा केंद्रावर जावे लागेल. यासाठी ‘परिशिष्ट-1’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारख्या काही सहाय्यक कागदपत्रांची प्रत सोबत ठेवावी लागेल.

Leave a Comment