Loan Scheme For Womenनमस्कार मित्रांनो महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मोदी सरकारने स्वर्णिमा योजना सुरु केली आहे. या योजनेतून मागासवर्गीय महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या पाच टक्के व्याजाने उपलब्ध करून दिले जात आहे .सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे ही योजना राबविली जात आहे.कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता उद्योग सुरु करण्यासाठी स्वर्णिमा योजना महिलांना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
हे सुद्धा बघा : या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार ३ हजार रुपये लगेच यादीत नाव तपासा
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. स्वर्णिमा योजनाही या दोन योजनांना पूरक ठरू शकते.स्वर्णिमा योजनेद्वारे केंद्र सरकारच्या सुविधांचा लाभ घेत महिला उद्योजकांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल उचलता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि पात्रता निकष, नियम व अटी जाणून घ्या!
स्वर्णिमा योजनेसाठी कोण असेल पात्र?
अर्जदार महिला असावी
अर्जदाराचे वय वर्षे १८ ते ५५ या दरम्यान असावे
महिलेची स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची तयारी असावी
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे
हे सुद्धा बघा : या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार ३ हजार रुपये लगेच यादीत नाव तपासा
स्वर्णिमा योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात?
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
शिधापत्रिका
रहिवासी प्रमाणपत्र
अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो
स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
इच्छुक महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात जाऊन स्वर्णिमा योजनेचा अर्ज भरावा.अर्जामध्ये व्यवसायाची आवश्यक माहिती, संकल्पना आणि प्रशिक्षणाची गरज असल्यास ते नमूद करा अर्ज भरून राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर होईल.