Farmer scheme what apply मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) शेतकऱ्यांना आर्थिक आधार प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत, योग्य पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात, जे 3 समान हफ्त्यात 2,000 रुपये दरमहा दिले जातात.या योजनेतुन मिळणारे पैसे शेतकऱ्यांच्या कृषी संबंधित कामांसाठी उपयोगी पडतात . या योजनेची 2019 मध्ये घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहचविण्यासाठी काही मोठ्या प्रयत्नांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता
आतापर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांचे वितरण करण्यात आले असून, लवकरच शेतकऱ्यांना 20 वा हप्ता दिला जाणार आहे. तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल, अन त्याचे फायदे काय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत.शेतकऱ्यांना शेतजमीन असावी.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदीमध्ये नोंदवलेले असावे.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. जसे कि , आधार कार्ड, बँक खाते अन मोबाईल नंबर लिंक असावे.या योजनेचा लाभ फक्त लहान अन गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, प्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाइट वर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर “New Farmer Registration” पर्यायावर क्लिक करा.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता
हि प्रक्रिया झाल्यानंतर १२ अंकी आधार नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकून देखील ऑनलाइन अर्ज करू शकता. यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा. हि माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट बटनावर क्लीक करा.
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया साधी आणि सोपी आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचा फायदा मिळवता येईल.