नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदाची बातमी आहे. नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे..या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात (MSRTC) समुपदेशक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
हे सुद्धा बघा : ही कागदपत्रे असतील तर तुम्हाला कोणतीही बँक देईल गृहकर्ज बघा संपूर्ण यादी
समुपदेशक पदासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही नेमणूक मानद तत्वावर होणार आहे. १ वर्षासाठी ही भरती करण्यात येणार आहे.एसटी महामंडळात एकूण २ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युतर पदवी प्राप्त केललेी असावी. मानसशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन (M.A in Psychology) केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थांमध्ये कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा.सांगली (Sangli)येथे ही भरती केली जाणार आहे.
हे सुद्धा बघा : ही कागदपत्रे असतील तर तुम्हाला कोणतीही बँक देईल गृहकर्ज बघा संपूर्ण यादी
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला पेपरवर अर्ज लिहावा त्यावर तुमचा फोटोदेखील चिटकवावा, यानंतर अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखल, शैक्षणिक प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे जोडावे. हा अर्ज तुम्ही २१ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करायचा आहे. तुम्हाला विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली, पिन ४१६४१६ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.