नमस्कार मित्रांनो सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी खास योजना राबवली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी श्रमयोगी योजना राबवली आहे . या योजनेत कामगारांना आर्थिक मदत केली जाते.संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएफ खात्यात दर महिन्याला पेन्शन मिळते. तसेच त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनदेखील मिळते.
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर सौर कृषी योजनेत बदल या शेतकऱ्यांचा होणार आता फायदा
परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला पेन्शन मिळावी, यासाठी ई-श्रम योजना राबवण्यात आली आहे.श्रमयोगी योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल कार्डदेखील दिले जाते. ई-श्रम कार्ड असल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे.संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन (Pension) मिळते. परंतु असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी अशी कोणतीही सोय नसते. त्यामुळे ही योजना राबवली आहे. या योजनेत ३००० रुपयांची पेन्शन मिळते. ई-श्रम योजनेअंतर्गत नागरिकांना विमा कव्हरदेखील मिळणार आहे.
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर सौर कृषी योजनेत बदल या शेतकऱ्यांचा होणार आता फायदा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १६ ते ५९ वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी https://eshram.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर eShram ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर चाका.यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार. त्यावर क्लिक करा.यानंतर तुमच्या कौशल्याची माहिती, बिझनेस, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये काम करतात हा ऑप्शन निवडा.यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सिलेक्ट करुन तो भरायचा आहे.हा फॉर्म सबमिट करायचा आहे. यानंतर तुमचे ई-श्रम कार्ड तयार होईल. ते तुम्ही डाउनलोड करु शकतात.