कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! या दिवसापासून होणार 8वा वेतन आयोग लागू मोठी अपडेट आली समोर

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया वेगात सुरू असून, लवकरच अध्यक्ष आणि सदस्यांची अधिकृत घोषणा होणार आहे.यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासामिळण्याची शक्यता आहे. (8th Pay Commission)आर्थिक मंत्रालयाच्या खर्च विभागाने (DoE) 21 एप्रिल रोजी दोन महत्त्वपूर्ण परिपत्रकं जारी करत 42 पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

हे सुद्धा बघा : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा.! रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय

यामध्ये सल्लागार, सचिवालय कर्मचारी, उपसचिव तसेच इतर 37 पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आयोगासाठी अध्यक्ष व दोन मुख्य सदस्यांची नावे जवळपास अंतिम करण्यात आली असून, त्यांची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहेया वेळी आयोगातील सदस्यांची संख्या मागील वेतन आयोगांपेक्षा कमी असणार आहे. उदाहरणार्थ, सातव्या वेतन आयोगात एकूण 45 सदस्य होते, तर आठव्या वेतन आयोगात ही संख्या कमी ठेवण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात पहिल्या वेतन आयोगात 9 सदस्य होते, तर पाचव्या वेतन आयोगात केवळ 3 सदस्य होते.जेसीएम (JCM) स्टाफ साईडने आयोगासमोर मांडणी करण्यासाठी निवेदन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा बघा : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा.! रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय

22 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर, वेतनश्रेणी, भत्ते, पदोन्नती धोरण आणि पेन्शन यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. एक मसुदा समिती स्थापन करून सर्व संबंधित संघटनांना 20 मे 2025 पर्यंत सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सरकारकडून आयोगाची औपचारिक घोषणा अद्याप झाली नसली तरी, आतापर्यंतच्या हालचाली आणि नियुक्त्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की केंद्र सरकार लवकरच आयोग स्थापन करणार आहे. एकदा आयोग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर देशभरातील 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 57 लाख पेन्शनधारकांना वेतन, भत्ते आणि इतर सुविधा यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत

Leave a Comment