नमस्कार मित्रांनो सरकारने लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दिली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात २१०० रुपयांच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी पडणार याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरु केली होती.ही योजना जून महिन्यांपासून सुरु झाली आहे.
या योजनेत आता १५०० च्या ऐवजी २१०० रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन राज्य सरकारने निवडणूकाच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्णता अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते मिळालेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सरुवात झाली आहे.मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचाहप्ता 2100 रुपये होणार आहे.
महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार असल्याचे देखील राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.