नमस्कार मित्रांनो राज्यतील ज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे.या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६००० रूपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
हे सुद्धा बघा : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार, 1 एप्रिलपासून बँकांचे हे 7 नियम बदलणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बँकेत जमा झाला का नाही? हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरही चेक करता येते.
हप्त्याचे स्टेटस कसे चेक कराल?
खालील प्रक्रिया तुमचा फोन आडवा (Horizontal) पकडून करा.
१) पुढील लिंकवर क्लिक करा https://nsmny.mahait.org/
२) त्यानंतर लाल रंगात Beneficiary Status दिसेल त्यावर क्लिक करा.
३) त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर Enter Mobile number याठिकाणी टाकायचा आहे.
हे सुद्धा बघा : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार, 1 एप्रिलपासून बँकांचे हे 7 नियम बदलणार
४) नंतर खालील दिलेली इंग्रजी अक्षरे कॅप्चा कोड खाली टाकायची आहेत.
५) त्यानंतर तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी येईल तो खाली टाकायचा आहे.
६) त्यांनतर Get Data गेट डाटावर क्लिक करा.
७) त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल. कोणता हप्ता किती तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला त्यात तुम्हाला आताचा हप्ता जमा झाला कि नाही हे पण दिसेल.