शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा सहावा हप्ता मंजूर करण्यात आला आहे.तसेच, मागील काही हप्त्यांचे प्रलंबित थकबाकी भागवण्यासाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाने अधिकृत आदेश जारी केला असून, लवकरच हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.शेतकऱ्यांसाठी असलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा आर्थिक लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मागील हप्त्याच्या वितरणावेळी केवळ ‘पीएम किसान’ योजनेचा हप्ता देण्यात आला होता, मात्र ‘नमो’ योजनेचा निधी शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता.

हे सुद्धा बघा : शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; अशाप्रकारे करा अर्ज

त्यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी प्रतीक्षा करत होते. अखेर सरकारने सहाव्या हप्त्यासह मागील काही थकीत हप्त्यांचेही वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या अधिकृत आदेशानुसार, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील सहाव्या हप्त्यासाठी 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी वाटपासाठी मंजूर झालेल्या निधीतून 653.50 कोटी रुपये शिल्लक असून, हा निधीही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नमो शेतकरी सन्मान योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित हप्त्यांचे वितरण करण्यात येते.

हे सुद्धा बघा : शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; अशाप्रकारे करा अर्ज

आतापर्यंत पाच हप्त्यांचे वाटप पूर्ण झाले असून, सहाव्या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी आता मंजूर झाल्याने लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासावीत आणि लवकरच मिळणाऱ्या हप्त्यासाठी तयार राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत घेत आहेत. यंदा हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे अनेक भागातील शेती मोठ्या अडचणींना सामोरी गेली आहे. त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment