नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची पडताळणी सुरु होती . त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होतेआता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.आजपासून महिलांच्या बँक खात्यात या महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनके महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.काही महिला अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत होत्या , पण पडताळणी दरम्यान अशा महिलांना वगळण्यात आले आहे.
हे सुद्धा बघा : सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर झाले समाविष्ट अशा प्रकारे करा निवड
ज्यामुळे सरकारने 945 कोटी रुपये वाचवले आहेत. या योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या नेतृत्वाखालील महिला आणि बालविकास विभागाला 3,490 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.यामुळे महिलांना सहज योजनेचा हप्ता मिळत राहील. राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार 5 लाख महिलांना अपात्र ठरवून योजनेतून वगळले आहे. जानेवारी अखेर महिला लाभार्थ्यांची संख्या 2.41 कोटीवर कमी झाली होती. फेब्रुवारी महिन्यात आणखी महिलांना वगळले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे सुद्धा बघा : सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर झाले समाविष्ट अशा प्रकारे करा निवड
कुटुंबांमध्ये चारचाकी असलेल्या आणि टॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. असं असूनही, काही अपात्र महिलांना मासिक हप्ता 1500 रुपये वितरित करण्यात आला होता , यावर महिला आणि बालविकास विभागाने पडताळणी करून , त्याना पुढील हप्ता भेटणार नाही असे जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, अपात्र (Ladki Bahin Yojana) महिलांकडून हे पैसे परत घेतले जाणार नाहीत.